Madhya Pradesh Accident: अनियंत्रित ट्रकने 6 जणांना चिरडले, 25 हून अधिक जखमी, मध्य प्रदेशातील लग्न मिरवणूकीतील दुर्घटना
Jabalpur Accident PC TWITTER

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातीस जबलपूर- भोपाळ राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (११ मार्च) रात्री एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन वरातीत घुसल्याने अपघात घडून आला.यात अपघातात 6 वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.  (हेही वाचा- गोरखपूरमध्ये कारने तिघांना चिरडले, दोघांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ आला समोर)

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. सोमवारी रात्री जबळपूरच्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस आरोपी ट्रक चालकाचा शोध घेत आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून ट्रकची तोडफोड केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित केली. जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली. ट्रक अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होशंगाबादहून रायसेन येथे लग्नाची मिरवणूत आली होती. रस्त्यावर वऱ्हाडी नाचत असताना दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रकच्या खाली येऊन 6 जण चिरडले गेले आणि त्यामुळे जागीच मृत्यू झाला. भोपाळ येथील जिल्ह्या रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.