Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Rajastan Crime News: राजस्थानच्या उदयपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू कॉलनीत दोन महिलांचे मृतदेह आढळून आले आहे. दोन सख्या बहिणी असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही वृध्द महिलांच्या डोक्यावर खोल जखमांच्या खुणा आढळूना आल्या आहे.त्यामुळे पोलिसांना त्या दोघींचा खून झाल्याचा संशय येत आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टसाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उदयपूरातील अंबा माता परिसरातील नवरत्न कॉम्प्लेक्स्च्या डायमंड कॉलनीत घडली. शुक्रवारी रात्री वॉचमन घरी पोहोचला तेव्हा खोलीत दोन महिलांचे मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वॉचमनने पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. हुसैन अली आणि सारा या सख्खा बहिणी होत्या. दोघीही घरात एकट्याच राहत होत्या.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी क्राईम ब्रांचने तपास सुरु केला. हत्येचे वृत्त परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुट्टी संपवून वॉचमन कॉलनीत आला तेव्हा त्याला खोलीत रक्ताने माखलेला दोन मृतदेह आढळला. पोलिसांनी या घटनेतील आरोपीला शोधण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहे.