saliva mixed in juice, NOIDA PC TW

Saliva Mixed In Sugarcane Juice In Noida: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून किळसवाणा प्रकार समोर आला आहे. उसाचा रसमध्ये लाळ मिसळून दिल्याने या प्रकारणी दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी 15 जून संध्याकाळी घडली आहे. या प्रकरणी क्षितिज भाटिया या व्यक्तीने पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ( हेही वाचा- ऑनलाइन ऑर्डर केलेल्या अमूल आईस्क्रीम टबमध्ये आढळली गोम, नोएडातील महीलेकडून व्हिडिओ शेअर(Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील फेज 3 पोलिस स्टेशन हद्दीतील सेक्टर 121 मधील क्लिओ काऊंटी सोसायटीच्या बाहेर उसाच्या रसाचे दुकान आहे. तेथे हा किळसवाणा प्रकार घडला आहे. तक्रारदार शनिवारी पत्नीसह दुकानात पोहोचला आणि त्यांनी दोन ग्लास उसाचा रस मागवला. त्यानंतर दुकानदाराना त्यांच्या ग्लासमध्ये थुंकले आणि त्यांना सर्व्ह करण्यापूर्वी ते रसमध्ये मिसळले. तक्रारदाराने या कृत्याचा निषेध केला. दुकानदाराने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना शिवीगाळ देखील केली.

या घटनेनंतर संतापून ग्राहकाने पोलिस ठाणे गाठले. दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तक्रारानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून अश्या अनेक किसळवाणा प्रकार घडत चालला आहे. त्यामुळे एकीकडे नागरिक संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी असुरक्षतेचा प्रश्न उपस्थित केला आहे.