प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Tweezers Left in Patient’s Stomach: केरळमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. पाच वर्षांपूर्वी डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवून शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात चिमटा सोडला होता. पाच वर्षे महिलेच्या पोटात चिमटा राहिला. कोझिकोड येथील रहिवासी असलेल्या हर्शिनिया या 30 वर्षीय महिलेने गेल्या महिन्यात तीव्र वेदना झाल्यानंतर 17 सप्टेंबर रोजी ऑपरेशन करून चिमटा काढला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तक्रारीवर कारवाई करत चौकशीचे आदेश दिले आणि आरोग्य सचिवांना लवकरच अहवाल सादर करण्यास सांगितले. नोव्हेंबर 2017 मध्ये या महिलेवर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तीव्र वेदना होत होत्या. अनेक डॉक्टरांशी संपर्क साधला.

अँटीबायोटिक्सने वेदना कमी झाल्या होत्या. पण गेल्या सहा महिन्यांपासून ते असह्य झाले होते. सीटी स्कॅन केल्यानंतर पोटात चिमटा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चिमटा काढला. (हेही वाचा - Congress MLA Bhanwar Lal Sharma Passed Away: काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांचे निधन, राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यामुळे आले होते चर्चेत)

सिझेरियन प्रसूतीवेळी डॉक्टरांचा निष्काळजीपणा -

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2017 मध्ये कोझिकोड येथील रहिवासी असलेल्या हर्शिनियावर येथील कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्यांदा प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याआधी दोन्ही वेळा खासगी रुग्णालयात ऑपरेशन करून तिची प्रसूती झाली. पीडितेने सांगितले की, 'तिसऱ्या शस्त्रक्रियेनंतर मला तीव्र वेदना होऊ लागल्या. मला वाटले की हे सिझेरियन शस्त्रक्रियेमुळे झाले आहे. त्यानंतर मी अनेक डॉक्टरांशी संपर्क साधला. मला वाटले की मला एकतर किडनी स्टोन आहे किंवा काही प्रकारचा कर्करोग आहे. त्यांनी पुढे सांगितले की, त्यावेळी त्यांनी अँटिबायोटिक्स वगैरे घेतल्या, त्यामुळे त्यांचा त्रास कमी झाला असता, पण गेल्या सहा महिन्यांपासून वेदना वाढल्या होत्या.

त्यानंतर किडनी स्टोन असल्याच्या संशयावरून खासगी रुग्णालयात त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर नेमकी परिस्थिती समजू शकली. खासगी डॉक्टरांनी सांगितले की, 'तुमच्या पोटात धातूची वस्तू आहे. यामुळे मला लघवीचा संसर्ग झाला आहे. वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर मला जास्त अँटीबायोटिक्स देत असत.'

त्यानंतर तिने कोझिकोड मेडिकल कॉलेज गाठले. येथे, कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी 17 सप्टेंबर रोजी हर्शिनियावर मोठी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात गेल्या पाच वर्षांपासून असलेला चिमटा काढला. वैद्यकीय महाविद्यालयानेही महिलेच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.