New Banking Timings: आजपासून बॅंकेच्या व्यवहाराच्या वेळेत बदल; सकाळी 9 वाजता सुरू होणार व्यवहार
RBI | (File Image)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI)  नव्या नियमावली आता देशभरात बॅंकेच्या व्यवहाराची वेळ बदलण्यात आली आहे. आज 18 एप्रिल 2022 पासुन बॅंका 10 ऐवजी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या कामासाठी तासभर अधिक वेळ मिळणार आहे. बॅंकेच्या वेळेच्या बदल करण्याचा प्रस्ताव जुना आहे. मात्र मध्यंतरी कोविड 19 च्या संकटामुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती पण आता कोविड19 संकटाचे निर्बंध हटवल्याने बॅंकेच्या वेळेत बदल लागू केला जात आहे.

दरम्यान मागील आठवड्यात लॉंग विकेंड होता. भीम जयंती, गुड फ्रायडे विकेंडला जोडून आल्याने बॅंकांना सलग सुट्ट्या होत्या. आज पुन्हा लॉंग विकेंडनंतर बॅंकांचे काम सुरू होणार आहे. पण आता वेळेत बदल झाला आहे. देशात भारतीय स्टेट बँक (SBI) सह 7 सरकारी बँक आहेत. याशिवाय 20 पेक्षा अधिक प्राइवेट बँक आहेत. इन सर्व बँकांवर नया नियम लागू होईल. हे देखील नक्की वाचा: Card-Less Cash Withdrawal: आता कार्डशिवाय कोणत्याही ATM मधून काढता येणार पैसे; RBI गव्हर्नरने केली मोठी घोषणा .

पहा बॅंकांच्या विविध कामाच्या वेळा

कॉल/नोटीस/ टर्म मनी – 9:00 am to 3:30 pm

गर्व्हमेंट सिक्युरिटीजमधील मार्केट रेपो – 9:00 am to 2:30 pm

ट्राय पार्टी रेपो – 9:00 am to 3:00 pm

कमर्शिअल पेपर आणि सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स – 9:00 am to 3:30 pm

कॉर्पोरेट बॉन्ड्स मधील रेपो - 9:00 am to 3:30 pm

गर्व्हेमेंटसिक्युरिटीज – 9:00 am to 3:30 pm

फॉरेन करंसी – 9:00 am to 3:30 pm

Rupee Interest Rate Derivatives –9:00 am to 3:30 pm

Bi-Monthly Monetary Policyची घोषणा करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बँकेद्वारे नियंत्रित बाजार 18 एप्रिलपासून सकाळी 9 वाजल्यापासून व्यवहार सुरू करतील.