दिवाळी (Diwali) धनत्रयोदशीपूर्वी (Dhantrayodashi) शेअर बाजारात (Share Market) निराशा आहे. गुरुवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) 60,000 आणि निफ्टी (Nifty) 18,000 अंकांच्या खाली घसरला. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 1158 अंकांनी घसरून 59,984 वर तर निफ्टी 353.70 अंकांच्या घसरणीसह 17,857 वर बंद झाला. बँका, आयटी आणि धातू क्षेत्रात कमालीची घसरण झाली. बँकिंग समभागांमध्ये कोटक महिंद्रा बँक 89 रुपयांनी घसरून 2098 रुपयांवर, आयसीआयसीआय बँक 35 रुपयांनी घसरून 800 रुपयांवर बंद झाली. अॅक्सिस बँक आणि एसबीआयच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली.
गुंतवणूकदार बाजारात उच्च पातळीवर नफा बुक करताना दिसले. मिडकॅप स्मॉल कॅप समभागांमध्ये मोठी घसरण झाली. अदानी पोर्ट्स, आयटीसी, ओएनजीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदार नफा मिळविण्यात व्यस्त आहेत. रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, बजाज ऑटो, टाटा स्टील, इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात बंद झाले. हेही वाचा Agni-5 Missile: भारताला मोठे यश; अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पल्ला पाच हजार किमी