Kannauj House Collapsed: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौजमधील गोपालपूर गावात रविवारी एका कच्चा घराचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा (भाऊ बहिणी) मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळल्याची माहिती आहे. (हेही वाचा-मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, झाडाची फांदी कोसळून तीन जखमी (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालपूर येथे रविवारी पहाटे तीन वाजता पुट्टू लाल यांच्या कच्चा घराचे छत कोसळले. अपघाताच्या वेळी पुट्टू लाल हे कुटुंबासह घरात झोपले होते. छत कोसळल्याने सर्वजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. छत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घर कोसळल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
ग्रामस्थांनी तात्काळ ढिगारा हटवण्याचे काम सुरु केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे डॉक्टरांनी विवेक आणि सरिता (भाऊ आणि बहीण) यांना मृत घोषित केले आणि इतर चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले.
अपघाताची माहिती मिळताच, इंदरगड पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि स्थानिक लेखापाल घटनास्थळी दाखल झाले. पोलिस प्रशासनाने अपघाताचा तपास सुरु केला आहे. मुसळधार पावसामुळे छत कोसळल्याचे स्थानिकांनी माहिती दिली. पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली, पुट्टूलाल कुटुंब झोपडीत झोपले असताना, अचानक भिंत कोसळले. या घटनेमुळे दोन भावंडाचा मृत्यू झाला. भिंत कोसळल्याने संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले. छत पडल्याचा आवाज ऐकून गावातील ढिगारा हटवला आणि जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.