Sharad Pawar on Farmers Protest: केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन कृषी कायद्यांविषयी (Farm Bills 2020) चर्चा होईल की, नाही हे 30 डिसेंबर रोजी समजेल. यापूर्वी केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. मात्र, अद्याप हे प्रकरण मिटलेले नाही. दरम्यान, 30 डिसेंबरला मोदी सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा होणार असल्याची बातमी आहे. या प्रकरणावरून कॉंग्रेससह विरोधी पक्ष केंद्रावर सतत टीका करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान मोठे विधान केले आहे. 30 डिसेंबर रोजी मार्ग न निघल्यास आपल्याला विचार करावा लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी म्हटलं आहे की, 30 डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकर्यांच्या बैठकीत कोणता निर्णय होईल हे पाहणं आवश्यक ठरणार आहे. या बैठकीत एखादा मार्ग निघाला, तर आपल्याला आनंदी होईल. मात्र, योग्य मार्ग न निघल्यास आपल्याला बसून विचार करावा लागेल. शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. यापूर्वी बऱ्याच वेळा सरकारच्या वतीने वाटाघाटी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (हेही वाचा - 100th Kisan Rail: महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालच्या शालिमार दरम्यान धावणार 100 वी किसान रेल; आज PM Narendra Modi च्या हस्ते उद्धाटन)
30 दिसंबर को सरकार और किसानों की मीटिंग में क्या होता है वह हम देखेंगे। कोई रास्ता निकला तो खुशी होगी, नहीं निकला तो हमें बैठना होगा और सोचना होगा: एनसीपी अध्यक्ष शरद पवार pic.twitter.com/sCVadbFXKI
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2020
दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, कृषी कायद्यांबाबत शेतकर्यांच्या मनात खोटेपणाची भिंत तयार झाली आहे. ती लवकरच पडणार आहे. 30 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात बैठक होणार आहे.