100th Kisan Rail: महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालच्या शालिमार दरम्यान धावणार 100 वी किसान रेल; आज PM Narendra Modi च्या हस्ते उद्धाटन

पहिली किसान रेल ही ऑगस्ट 2020 मध्ये धावली होती. आठवड्याला धावणार्‍या या किसान रेलला पसंती वाढत गेली आणि त्यानंतर आता ही किसान रेल आठवड्यातून तीन वेळेस चालवली जाते.

100th Kisan Rail: महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालच्या शालिमार दरम्यान धावणार 100 वी किसान रेल; आज PM Narendra Modi च्या हस्ते उद्धाटन
PM Narendra Modi (Photo Credits: ANI/File)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 डिसेंबर) महाराष्ट्रातील सांगोला (Sangola) ते पश्चिम बंगाल मधील शालिमार (Shalimar) या दरम्यान धावणार्‍या 100 व्या 'किसान रेल' ला हिरवा कंदील दाखवणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरसिंग़द्वारा केला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, किसान रेल (Kisan Rail ) ही गेम चेंजर आहे. यामुळे देशभरात शेतीविषयक वस्तूंची, शेतमालाची ने-आण वेगवान झाली आहे. अल्पकाळ टिकणार्‍या अनेक वस्तूंसाठी ही महत्त्वाची सप्लाय चेन झाली आहे.

मल्टी कमोडीटी ट्रेन सर्व्हिस द्वारा फ्लावर, सिमला मिरची, कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरच्या, कांदे अशा भाज्या तर द्राक्षं, संत्रं, डाळिंब, केळी, सीताफळ अशी फळं देखील ने-आण केली जातात. दरम्यान या किसान रेल मध्ये कोणत्याही थांब्यावर लोडिंग, अपलोडिंगसाठी मर्यादा टाकलेल्या नाहीत. केंद्र सरकारने फळं आणि भाज्या यांच्या सबसिडीवर देखील आता 50% अधिक वाढ दिली आहे. शेतकरी अवघे काही किलो ते टन अशा कोणत्याही प्रमाणात त्याच्या गरजेनुसार मालासाठी बुकिंग करू शकतो.

दरम्यान आज संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांशी संवाद देखील साधतील.  (हेही वाचा, Kisan Special Parcel Train: भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी Indian Railways करणार मदत; आता फळे आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीवर मिळणार 50 टक्के सूट).

पहिली किसान रेल ही ऑगस्ट 2020 मध्ये धावली होती. आठवड्याला धावणार्‍या या किसान रेलला पसंती वाढत गेली आणि त्यानंतर आता ही किसान रेल आठवड्यातून तीन वेळेस चालवली जाते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2020 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).