Death (Photo Credits-Facebook)

फ्लॅटमध्ये AC लावताना तोल गेल्याने सहाव्या मजल्यावरून पडून मेकॅनिकचा मृत्यू

गुरुग्राम सेक्टर-82 येथील मॅपस्को रॉयल विले सोसायटीमध्ये एसी (AC) लावत असताना मॅकेनिकचा तोल गेल्याने तो सहाव्या मजल्यावरून खाली पार्कमध्ये पडला. मेकॅनिकला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा भीषण अपघात गुरुवारी सायंकाळी घडला. 29 वर्षीय मृत मेकॅनिकचे नाव अमन असे असून तो उत्तर प्रदेशमधील बिजनौर उत्तर प्रदेश येथील आहे. यासंदर्भात माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर या अपघाताप्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.

फ्लॅट मालकाने पोलिसांना सांगितले की, तो मॅपस्को रॉयल विले सोसायटीच्या रिजेंट टॉवरच्या फ्लॅट क्रमांक 604 मध्ये राहतो. त्यांनी नवीन एसी खरेदी केला होता. कंपनीच्या वतीने दोन मेकॅनिक एसी लावण्यासाठी गुरुवारी सायंकाळी फ्लॅटवर आले. एक मेकॅनिक आत तर दुसरा मेकॅनिक अमर बाल्कनीत एसी स्पेसच्या खाली बाल्कनीत होता. सायंकाळी 6.30 च्या सुमारास त्यांच्या हातातून एसीचा बाहेरचा भाग निसटला आणि त्याचा तोल गेला. तो थेट सहाव्या मजल्यावरून उद्यानात पडला. एसीचा बाहेरचा भाग बाल्कनीत पडला. मेकॅनिक खाली पडल्याने मोठा आवाज झाला. आवाज ऐकून गार्डसह इतर लोक घटनास्थळी पोहोचले. अमनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Crime: मुलाखती दरम्यान महिलेकडे शरीरसुखाची मागणी, 48 वर्षीय पुरुषाला अटक)

खेरकी दौला पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आला आहे. हा तरुण एका एसी उत्पादन कंपनीत कामाला होता. कंपनीच्या सांगण्यावरून हा तरुण आपल्या साथीदारासोबत सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एसी लावण्यासाठी गेला होता. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, फ्लॅट मालकाची चौकशी करण्यात आली आहे.

सोसायटीच्या स्थापनेनंतर 2018 मध्ये ओसी प्राप्त झाली आणि त्यानंतर खरेदीदारांना ताबा देण्यात आला. सोसायटीत 486 फ्लॅट आहेत. ज्यामध्ये 350 कुटुंबे राहतात. मेकॅनिकने एसी लावताना कोणतीही सुरक्षा उपकरणे वापरली नव्हती. त्याचवेळी फ्लॅट मालक आणि सोसायटीची देखभाल करणाऱ्या कंपनीला सुरक्षा उपकरणांशिवाय काम का करू देण्यात आले? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलिस शोधत आहेत. मेकॅनिकने सेफ्टी बेल्ट, हातमोजे आणि हेल्मेट घातले असते तर कदाचित दुर्घटना टळली असती.