Central Vista First Look (PC - ANI)

Central Vista First Look: सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवन आणि नवीन निवासी संकुलाचे काम जोरात सुरू आहे. आता या प्रकल्पाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. खरेतर, सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर झालेल्या सेंट्रल व्हिस्टा पुनरुज्जीवन प्रकल्पात 900 ते 1,200 खासदारांच्या आसनक्षमतेसह त्रिकोणी संसद भवनाची कल्पना आहे. दुसरीकडे या प्रकल्पावरून केंद्राला अनेकवेळा विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. विरोधकांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये लोक घरात बसून आहेत, तर दुसरीकडे या परिस्थितीचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर कोणताही परिणाम झालेला नाही.

केंद्रावर निशाणा साधत विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी टीका करताना म्हटलं होतं की, लॉकडाऊनच्या काळातही या प्रकल्पाचे बांधकाम बिनदिक्कतपणे सुरू आहे. यावरून केंद्र सरकार आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देण्यापेक्षा या प्रकल्पाकडे अधिक लक्ष देत असल्याचे स्पष्ट होते. (वाचा - Republic Day Celebration: आजपासून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला सुरुवात, फ्लायपास्टच्या वेळेत बदल; जाणून घ्या कार्यक्रमाबाबत सर्व काही)

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सेंट्रल व्हिस्टा पादचाऱ्यांना चोवीस तास अनुकूल बनवण्यासाठी राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दरम्यान आणि राजपथच्या बाजूने बागांमध्ये एकूण 915 प्रकाश स्तंभ असतील. पुरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "कोरोना लाटेसारख्या कठीण काळातही या प्रकल्पाचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे." ते म्हणाले की, बांधकामादरम्यान 25 झाडे काढण्यात आली. 22 झाडे स्थलांतरित करण्यात आली आणि तीन झाडांची येथे लागवड करण्यात आली.