Republic Day Celebration: भारत सरकारने यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासंदर्भात दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. खरं तर, प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता दरवर्षी 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. याशिवाय आता हा सोहळा आजपासून 30 जानेवारीपर्यंत आयोजित केला जाणार असून त्यात मुख्य सोहळा 26 जानेवारीला सुरू होणार आहे. त्याचबरोबर कार्यक्रमातील फ्लायपास्ट 10 ऐवजी 10.30 वाजता सुरू होणार आहे. परेडच्या वेळेत बदल होण्याचे मुख्य कारण म्हणजे दृश्यमानतेत झालेली सुधारणा असल्याचे सांगितले जाते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त हा सोहळा 23 जानेवारीला सुरू होणार असून, 30 जानेवारीला शहीद दिनानिमित्त त्याची सांगता होणार आहे. राष्ट्रीय राजधानीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुमारे 1000 ड्रोन, 75 लष्करी विमाने आणि 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालये सहभागी होतील. (वाचा - Netaji Subhas Chandra Bose Jayanti: पंतप्रधान आज नेताजींच्या पुतळ्याचे करणार इंडिया गेटवर अनावरण, पराक्रम दिवस होणार साजरा)
परेडला भेट देणाऱ्यांच्या संख्येत घट
याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या परेडला येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी, जेव्हा पहिली कोविड -19 लाट कमी होत होती, तेव्हा सुमारे 25,000 व्हिजिटर्संना परवानगी देण्यात आली होती. या वर्षी, संख्या 5,000 ते 8,000 च्या दरम्यान कमी झाली आहे आणि कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे काम अजूनही सुरू आहे. दरम्यान, आज दिल्लीत 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची फुल ड्रेस रिहर्सल आहे.