Netaji Subhas Chandra Bose Jayanti: पंतप्रधान आज नेताजींच्या पुतळ्याचे करणार इंडिया गेटवर अनावरण, पराक्रम दिवस होणार साजरा
(Photo Credit - Twitter)

नेताजी म्हणून प्रसिद्ध असलेले आदरणीय स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांची (Netaji Subhas Chandra Bose) आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारने (Central Govt) नेताजी यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी 23 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव (Republic Day Celebration) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, जो या वर्षीपासून पराक्रम दिवस (शौर्य दिवस) म्हणून साजरा केला जाईल. नेताजी यांच्या जयंतीनिमित्त संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये (Parliament House) त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. हा पुष्पहार अर्पण समारंभ 23 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे.

दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही माहिती दिली. जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 23 जानेवारी रोजी नेताजींच्या जयंतीदिनी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार.

Tweet

होलोग्राम म्हणजे काय? 

सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ज्या छत्रीमध्ये आहे, याआधी पाचव्या जॉर्ज यांचा पुतळा होता. तिथे नेताजी यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. 1968 मध्ये जॉर्ज पंचमचा पुतळा हटवण्यात आला, तेव्हापासून ही छत्री रिकामीच आहे. होलोग्राफिक हा डिजिटल तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे. हे प्रोजेक्टरसारखे काम करते, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीला 3D आकार दिला जाऊ शकतो. या तंत्रामुळे असे वाटते की आपल्या समोरची गोष्ट खरी आहे, परंतु ती फक्त 3D डिजिटल प्रतिमा आहे. (हे ही वाचा Weather Updates in India: दिल्ली-यूपीसह उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर; 'या' राज्यांमध्ये पडणार पाऊस)

नेताजी महान स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक

रक्ताच्या बदल्यात स्वातंत्र्य देण्याचे वचन देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे. 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओरिसा येथे एका संपन्न बंगाली कुटुंबात जन्मलेल्या नेतीजी यांना कोणत्याही किंमतीत आपल्या देशाला स्वातंत्र्य हवे होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या नावासाठी समर्पित केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. नेताजी हा देशातील कट्टरपंथी विचारसरणीच्या तरुणांचा चेहरा मानला जात होता, ज्यांना कोणत्याही किंमतीत स्वातंत्र्याच्या बंधनातून भारत माता मुक्त करण्याची तळमळ होती. ते काँग्रेसचे अध्यक्षही होते.