Uttar Pradesh News: आगीचा स्टंट जीवाशी बेतला, तरुणाचा चेहरा भाजला; घटनेचा Video व्हायरल
Fire STUNT: PC TWITTER

Uttar Pradesh News: लग्नाच्या मिरवणूकीत पेट्रोल तोंडात घालून हवेत आग पसरवणाऱ्या तरुणाला हा आगीचा खेळ जीवाशी बेतला आहे. या आगीमुळे तरुणाचा चेहरा जळल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या मिरवणूकीतील या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील शिशगरान परिसरातील घडली. या घटनेनंतर लग्नात बरच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. (हेही वाचा- हैद्राबाद येथे तरुणाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू, घटना CCTV कैद)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहपूर येथील हर्षल चौधरी असं या पीडित तरुणाचे नाव आहे. आगीच्या खेळात हर्षलचा चेहरा जळाला आहे. आगीसोबत खेळतानाचा हा क्षण एकाने फोनमध्ये कैद केले आहे. लग्नात समारंभात आलेल्या पाहुण्यांनी हर्षला वाचवले. आग लागल्याचे पाहून काही जणांनी मदत केली. आग चेहऱ्याला लागल्याने कपाळ आणि हनुवडी संपुर्ण भाजले आहे.

हर्षलाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लग्नाच्या कार्यक्रमात या घटनेमुळे गोंधळ निर्माण झाला. आगीच्या खेळ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मध्यप्रदेशात अशीच एक घटना घडली होती. स्टंट करणाच्या नादात तरुणाचा चेहरा भाजला गेला.