Hydrabad Shocker: हैद्राबाद येथे तरुणाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू, घटना CCTV कैद
Youth falls into water tank and dies in Hyderabad PC TWITTER

Hydrabad Shocker: हैद्राबाद येथील गचीबोवली भागातील वसतिगृहातील एका २२ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू  (Death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चालता चालता इमारतीच्या आत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. पडल्यानंतर त्याचा काही वेळाने मृत्यू झाला. सांयकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर समोर आले की, तरुण  पाण्याच्या टाकीत पडला आहे. या घटनेचा फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- लोकांच्या आरोग्याशी खेळ; व्यक्तीला ज्यूसच्या पॅकेटमध्ये सापडला बुरशीसारखा पदार्थ, )

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अकमल असं तरुणाचे नाव आहे. तो किराणा सामान घेऊ घरात प्रवेश करतो होता. त्यावेळी पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे होते. चालता चालता त्याचा पाय पाण्याच्या टाकीत गेला आणि तो पडला. काही वेळाने इमारतीतील काही सदस्य बाहेर येतात. काही आवाज आल्याने ते शोधा शोध घेतात.पाण्याच्या टाकीत शोध घेतात परंतु त्यांना काहीच दिसत नाही.

पहा घटनेचा CCTV फुटेज

सायंकाळ पर्यंत शेख पाण्याच्या टाकीत होता. सीसीटीव्हीतून समजले की, शेख पाण्याच्या टाकीत पडला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बचाव कार्य आणि पोलिस घटनस्थळी पोहचतात. त्यांनी शेखचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढला. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.   पोलिसांनी वसतिगृह चालवणारे महेंद्र रेड्डी यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला. पाण्याच्या टाकीचा झाकणं उघडं असल्यामुळे ही घटना घडली.