National Herald Case: ईडीने दिलेल्या समन्सबाबत काँग्रेस 12 जून रोजी घेणार देशव्यापी पत्रकार परिषद
Sonia Gandhi And Rahul Gandhi (Photo Credit - Twitter)

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात ईडीच्या (ED) समन्सवरून चांगलेच राजकारण तापले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्याच्या मुद्द्यावर उद्या, 12 जून रोजी काँग्रेस (Congress) देशव्यापी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या सोनिया गांधी यांना ईडीने समन्सची नवी तारीख दिली आहे. ईडीने आता 23 जून रोजी सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहे. मात्र, यापूर्वी ईडीने त्यांना 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्या हजर होऊ शकल्या नाही. त्याचवेळी ईडीने राहुल गांधींना 13 जूनला समन्स बजावले आहे.

आमच्या नेत्यांन विरोधात षडयंत्र रचले जात आहे

शुक्रवारी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भगवा पक्ष काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना धमकावू इच्छित आहे. तसेच नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी समन्सचे पालन करतील आणि ईडीच्या कार्यालयात जातील असेही सांगितले. ते म्हणाले की, ईडी आणून भाजप सोनिया गांधी आणि राहुल गांधींना घाबरवायचे प्रयत्न करत आहे. ज्या तारखेला त्यांना बोलावण्यात आले आहे, त्या तारखेला राहुल गांधी जाणार आहेत. आम्ही आमच्या नेत्यांसोबत शांततेत जाऊ. आमच्या पक्ष आणि नेत्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. (हे देखील वाचा: मोदी सरकार भारताचा विश्वासघात करत आहे, लडाख सीमेवर चिनी बांधकामाबाबत राहुल गांधींची भाजपवर टीका)

Tweet

23 जूनला सोनिया गांधी हजर राहणार

ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना आता 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सोनिया गांधी सध्या कोरोना संसर्गातून बरे आहेत.