Indore News: इंदौर येथे सेंट जोसेफ कॉलेज ऑफ नर्सिंगच्या दहा विद्यार्थ्यांना विषबाधा, दोघींची प्रकृती गंभीर
हॉस्पिटल । Representational Image (Photo Credit: PTI)

Indore News: इंदौर येथील होशंगाबाद येथील सेंट जोसेफ कॉलेज ऑफ नर्सिंगचे दहा विद्यार्थी सोमवारी आजारी पडले आहे. जवळच असलेल्या बाणगंगा येथील हॉस्टेलमध्ये नाश्ता केल्यानंतर आजारी पडले आहेत अशी माहिती समोर येत आहे. विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी आल्या. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-  नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड)

मिळालेल्या माहितीनुसार, आजारी पडल्यानंतर मुलांना  महाराजा यशवंतराव (MY) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. नर्सिंग शिक्षिका कीर्ती देहरिया यांच्या म्हणण्यानुसार, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची तुकडी एमजीएम मेडिकल कॉलेजशी संबंधित असलेल्या सरकारी मानसिक रुग्णालयात मानसोपचार पोस्टिंगसाठी आली होती. 'आम्ही सर्वजण बाणगंगा परिसरात एका खाजगी निवासस्थानात राहतो.

१० मुलींनी सोमवारी सकाळी चंद्रगुप्त स्क्वेअर जवळील श्री नाथ हेस्ट हाऊसमध्ये नाश्ता केला. नंतर त्या सर्वांना उलट्या आणि मळमळाचा त्रास होऊ लागला. आजारी विद्यार्थ्यांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलींनी नाश्त्यात भात खाल्ला होता. हॉटेल मालकाने शिळे भात दिल्याचा संशय आला आहे. या घटनेनंतर कॉलेजमध्ये एखच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर हॉटेलमध्ये अन्न हे तपासणी  चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांने दिली आहे.