Representational Image | (Photo Credits: PTI)

Pregnant Woman Murders Husband: देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. यातच तामिळनाडू (Tamil Nadu) येथून सर्वांनाच हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. पेरियामोलपलायम (Periyamolapalayam) परिसरात एका गर्भवती महिलेने तिच्याच पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्ती हा आरोपी महिलेवर जबरदस्तीने सेक्स करायचा. या गोष्टीला वैतागूनच महिलेने आपल्या पतीच्या जेवणात विष कालवून त्याला ठार केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

संबंधित महिलेचे 8 आठ महिन्यांपूर्वी कलीयानान थोटम येथील एन नंद कुमार याच्याशी लग्न झाले होते. नंद कुमार शेतकरी असून त्याचे हे दुसरे लग्न होते. आरोपी महिला ही पाच महिन्याची गर्भवती आहे. मात्र, तरीही तिचा पती सेक्स करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करत असल्याची माहिती मिळत आहे. याच त्रासाला वैतागून या महिलेने कुमारला ठार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या महिलेने 28 जानेवारी रोजी कुमारच्या जेवणात उंदीर मारण्याचे किटकनाशक मिसळले. हे जेवण खाल्यानंतर कुमारची तब्येत ढासळली. त्यानंतर 31 जानेवारीला त्याला अंधियार येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अखेर 15 फेब्रुवारीला कुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh: स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमचं दिली जाणार एका महिलेला फाशी; जाणून घ्या सविस्तर वृत्त

कुमारच्या मृत्युनंतर रुग्णालय प्रशासनाने माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशीदरम्यान आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला. या महिलेला 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.