Himachal Pradesh New CM: हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. हायकमांडने मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले आहे. हायकमांडने सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक अद्याप सुरू झालेली नाही. यापूर्वी विधानसभेच्या बैठकीसाठी आलेले मुकेश अग्निहोत्री सिसाल हॉटेलमध्ये परतले आहेत. येथे काँग्रेसने आज संध्याकाळी 5 वाजता राज्यपालांशी भेटीची वेळ मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री रविवारी शपथ घेऊ शकतात.
पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुखू यांच्या नावाला मान्यता दिली आहे. इतर नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या पुढच्या नेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेस हायकमांडला अधिकृत करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर एक दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा - गुजरात विधानसभा निवडणूकीने AAP चा केला राष्ट्रीय पक्ष बनवण्याचा मार्ग मोकळा; Arvind Kejriwal यांनी मानले मतदारांचे आभार)
माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंग यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केल्यानंतर सखू यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Sukhwinder Singh Sukhu to be next Himachal CM, Congress high command approves his name: Sources
Read @ANI Story | https://t.co/uuGAtSPV5V#HimachalPradesh #HimachalCMCandidate #SukhvindersinghSukhu #HimachalCM #Congress pic.twitter.com/hKBYgIwcov
— ANI Digital (@ani_digital) December 10, 2022
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 जागा जिंकून विजय मिळवला होता. तर भाजपने 25 जागा जिंकल्या. सुखू हे नादौनचे आमदार आहेत आणि त्यांनी राज्यात अनेक संघटनात्मक पदे भूषवली आहेत.