Madhya Pradesh Suicide: 18 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट,इंदौर येथील खळबळजनक घटना
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Madhya Pradesh Suicide: मध्य प्रदेशातील इंदौर येथे एका १८ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शाळेचा निरोप समारंभात उपस्थितीत दाखवून घरी परतल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. आयुष चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही. खुडेल पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावात ही घटना घडली आहे.हेही वाचा-  सोनपेठ येथील पोलिस भरती करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष चौधरी हा सनावडिया गावातील रहिवासी होता. तो बारावीत शिक्षण घेत होता. आयुषने राहत्या घरी छताला गळफास घेतला. कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी रुग्णालयात त्याला मृत घोषित केले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आयुषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आयुषच्या मित्रांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा कबीरने सांगितले की, शनिवारी त्याचा शाळेत निरोप समारंभ होता. शाळेच्या कार्यक्रमात आनंदी होता. तो शाळेत ट्रॅक्टर घेऊन आला होता. तो संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मित्रांसोबत होता.

पोलिसांनी आयुषच्या कुटुंबाशी चौकशी केली, आयुष हा अभ्यासात चांगला होता त्याला कोणत्याही गोष्टीचे टेंशन नव्हते. गुरुवारी तो मामाच्या घरून परतला होता. त्याने टोकाचे निर्णय का घेतला हे अद्याप कुटुंबाला समजले नाही. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहे.