Maratha Reservation: सोनपेठ येथील पोलिस भरती करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलले टोकाचं पाऊल
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Maratha Reservation:  परभणीतील सोनपेठ तालुक्यात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील एका 25 वर्षीय तरुणाने आरक्षणाकरिता आत्महत्या केली होती. या दोन्ही घटना लागोपाठ झाल्याने शहारात एकच खळबळ उडाली आहे. आजवर अनेक तरुणांनी मराठा आरक्षणांसाठी आत्महत्या केली आहे. हेही वाचा- धनगर आरक्षण मुद्द्यावरुन तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी घेत संपवलं आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, सोनपेठे येथील तरुण पोलिस भरतीची तयारी करत होता. मराठा आरक्षणासाठी विलंब होत असल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. उध्दव बाळासाहेब जोगदंड असं तरुणाचे नाव आहे. तो अंतरवाली सराटी येथून तो संध्याकाळी सोनपेठे गावातील नरवाडी येथे पोहोचला. मराठा आरक्षणाच्या अंमलबजाणीला विलंब होत असल्याने तरुणाने आत्महत्या केली अशी चर्चा गावकरी करत आहे.

तरुणाने काल रात्री उशिरा झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. गावकऱ्यांना माहिती मिळताच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. जिस्हा प्रशासनासही पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थील पंचनामा केला. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली. उध्दव पोलिस भरतीचा सराव करत होता. तो बेरोजगार असल्याने आणि शेतकरी वर्गातून होता. मागिली वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांनी आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढले आहे.