Delhi-Bengaluru SpiceJet Flight Delayed: स्पाइसजेटच्या(SpiceJet) दिल्ली-बेंगळुरू फ्लाइट SG 8151 ला पायलटच्या अनुपलब्धतेमुळे(Pilot Unavailability) लक्षणीय विलंबाचा सामना करावा लागला, ज्यामुळे प्रवासी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर(IGI Airport) 48 तास अडकून पडले. निराश झालेल्या प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यात प्रवाशांची गर्दी दाखवली. एअरलाइन परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी असल्याने असंतोष व्यक्त केला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंनुसार, विमानतळाला फ्लाइटला जोडणारा एरोब्रिज प्रवाशांनी भरलेला आहे. हे सर्व तेच प्रवासी आहेत. ज्यांना उशीर झाला आहे. विमान कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे उड्डाणासाठी पायलट नाही आणि त्यामुळेच उशीर झाला.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)