नोएडा येथील स्पाईस मॉलला भीषण आग
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नोएडा येथील स्पाईस मॉलला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मॉलच्या टॉपच्या दोन मजल्यावर ही आग लागली आहे. टॉपच्या दोन मजल्यावर सिनेमागृह असल्याचे समजते आहे. आग लागल्याचे कळताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, अद्याप आग कशामुळे लागली याची माहिती समोर आली नाही.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली भारतीय आयुर्विज्ञान संस्थाच्या इमरजेंसी वार्डमध्ये शनिवारी अचानक आगीने पेट घेतला होता. त्यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशमन दलाच्या २० ते २५ गाड्या उपस्थित झाल्या होत्या. तब्बल ८ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली होती. त्यावेळी कोणतीच जीवीतहानी झाली नव्हती. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. हे देखील वाचा-धक्कादायक! नागालँड आणि म्यानमार येथे भूकंपाचे हादरे

एएनआयचे ट्वीट-

गेल्या काही वर्षापासून आगीचे प्रमाण वाढतच चालले आहे. सध्या ज्या मॉलला आग लागली आहे. तिथे मोठ्याप्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्यांकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे.