UP Road Accident: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे भरधाव ट्रकची ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक, 4 महिलांचा मृत्यू; 24 जखमी

वीरेंद्र सिंह हे ट्रॅक्टर ट्रॉलीने नातेवाईकांसह बेलधारा गावात गेले होते. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सर्वजण ट्रॅक्टर ट्रॉलीने घरी परतत होते. या अपघातात 4 महिलांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय टीम लेटेस्टली|
UP Road Accident: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे भरधाव ट्रकची ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक, 4 महिलांचा मृत्यू; 24 जखमी
Accident (PC - File Photo)

UP Road Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक (Truck Collides With Tractor-Trolley) दिली. या अपघातात 4 महिलांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, कन्नौजच्या छिब्रामौ पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या कुंवरपूर गावातील रहिवासी वीरेंद्र सिंह यांच्या मुलीचे लग्न बिछवा पोलीस ठाण्याच्या बेलधारा गावात झाले आहे. त्यांच्या मुलीने 10 दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला होता. शुक्रवारी त्यांचा नामकरण सोहळा पार पडला. वीरेंद्र सिंह हे ट्रॅक्टर ट्रॉलीने नातेवाईकांसह बेलधारा गावात गेले होते. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सर्वजण ट्रॅक्टर ट्रॉलीने घरी परतत होते.

भोगाव परिसरातील द्वारकापूरजवळ ट्रॅक्टरची लाईट तुटली. चालकाने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करून लाईट दुरुस्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने ट्रॉलीला धडक दिली. त्यामुळे ट्रॉली पलटी झाली. या अपघातात ट्रॉलीत बसलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 24 जण जखमी झाले. (हेही वाचा - Uttar Pradesh Fire: उत्तर प्रदेशातील खोडा येथीला गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही)

पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात नेले जेथे द्रौपदी देवी यांची विशून दयाल यांचा मृत्यू झाला. सर्व मृत व जखमी हे कुंवरपूर छिब्रामाळ गावचे रहिवासी आहेत. (Navi Mumbai: पाम बीच रोडवर चालताना दिसले फ्लेमिंगो; वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांनी व्यक्ती केली चिंता (Watch Video))

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मैनपुरी येथे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बटाटे विकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना भरधाव वेगात आलेल्या अनियंत्रित ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले होते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर

  • World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos

  • शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change
    Close
    Latestly whatsapp channel