Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

JEE Aspirant Dies By Suicide In Kota: महाशिवरात्रीच्या दिवशी कोटा (Kota) येथून एक वाईट समोर आली आहे. येथील जेईई (JEE) परीक्षार्थी विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. विद्यार्थ्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. कोटा येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही सहावी घटना आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही कोटामधून वाईट बातम्यांचा ओघ थांबत नाही. परीक्षा आणि कामगिरीच्या दबावामुळे विद्यार्थी आपलं जीवन संपवत आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. अभिषेक कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. अभिषेकने शहरातील विज्ञान नगर भागात भाड्याच्या खोलीत विषारी द्रव्य प्राशन करून जीवन यात्रा संपवली.

पोलिसांनी सांगितले की, अभिषेकच्या खोलीतून विषारी पदार्थाची बाटली आणि सुसाईड नोट सापडली आहे. अभिषेकने सुसाईड नोटमध्ये 'माफ करा बाबा, मी जेईई करू शकत नाही...,' असं लिहिलं आहे. पोलिसांनी सांगितले की, अभिषेक कोचिंगमधील दोन परीक्षांना अनुपस्थित होता. या परीक्षा अनुक्रमे 29 जानेवारी आणि 19 फेब्रुवारी रोजी नियोजित होत्या. (हेही वाचा -Jalgaon Suicide: JEE Mains Exam मध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत संपवलं जीवन)

शवविच्छेदन करून विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. कोटामध्ये गेल्या काही महिन्यांत विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. यापूर्वी 23 जानेवारी रोजी कोटा येथे खासगी कोचिंगद्वारे NEET ची तयारी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. (वाचा -JEE-Main 2024 Result: जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर; jeemain.nta.ac.in वर पहा स्कोअर कार्ड)

दरम्यान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी कोचिंग संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये 2023 मध्ये 29 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कोचिंग सेंटर्सच्या उच्च-दबाव शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी अधिकारी तातडीने प्रयत्न करत आहेत.