Anacondas Found In Passenger Baggage (PC-X/@blrcustoms)

Anacondas Found In Passenger's Check-in Baggage: बेंगळुरू (Bangalore) च्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) 10 पिवळ्या ॲनाकोंडाची (Anaconda) तस्करी (Smuggling) करण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने अॅनाकोंडा आपल्या चेक इन बॅगेजमध्ये लपवले होते. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत बेंगळुरू कस्टम विभागाने सांगितले की, अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक केली आहे. सध्या प्रवाशांची चौकशी सुरू आहे. वन्यप्राण्यांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असे विभागाने सांगितलं आहे.

पिवळा ॲनाकोंडा ही अशी प्रजाती आहे जी पाण्याच्या जवळ आढळते. पिवळे ॲनाकोंडा सामान्यतः पॅराग्वे, बोलिव्हिया, ब्राझील, ईशान्य अर्जेंटिना आणि उत्तर उरुग्वे येथे आढळतात. कायद्यानुसार, वन्यजीव व्यापार आणि तस्करी भारतात बेकायदेशीर आहे. (हेही वाचा -Cattle Smuggling In Meghalaya: बांगलादेशात तस्करी करत असलेल्या 47 गुरांची सुटका, बीएसएफने केला पदार्फाश)

गेल्या वर्षी बेंगळुरू विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 234 वन्य प्राण्यांची सुटका केली होती, ज्यात एका कांगारूचा समावेश होता, ज्याची बँकॉकहून एका प्रवाशाने तस्करी केली होती. प्लॅस्टिकच्या पेटीत ठेवलेल्या कांगारूच्या पिल्लाचा गुदमरून मृत्यू झाला. (Mumbai News: मुंबईत सोन्याच्या तस्करीची मोठी कारवाई, 2 आरोपी ताब्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे या व्यक्तीच्या सामानाची झडती घेण्यात आली होती. त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये अजगर, गिरगिट, इगुआना, कासव आणि मगर सापडले होते.