तामिळनाडू येथे झालेला अपघात (Photo Credit: ANI/PTI)

तामिळनाडू यथे मंगळवारी फार मोठा अपघात झाला. येथील श्रीपेरंबुडूर (Sriperumbudur) रहिवासी क्षेत्रामध्ये विषारी गॅस लीक झाल्याने गुदमरून तब्बल 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इमर्जन्सी सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. एका अपार्टमेंटची दुषित टाकी साफ करण्याचे काम चालू होते त्यावेळी हा विषारी वायू श्वासावाटे शरीरात गेल्याने हा अपघात घडला. पहिल्यांना यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यांना वाचवायला इतर दोन लोक गेले आणि त्यांचाही मृत्यू झाला. ( हेही वाचा: भीषण अपघात: मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावर बस दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 45 लोक जखमी)

यातील तीन लोक हे एकाच कुटुंबातील आहेत. यांचे पार्थिव बाहेर काढून ते शव विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहे. पुरेश्या सुरक्षा गॅझेटच्या कमतरतेमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून घेतला असून याबाबत अधिक तपास चालू आहे.