बस दरीत कोसळून झालेला अपघात (Photo Credits: ANI)

तोरंगणा घाटात एक खासगी बस 25 फुट दरीत कोसळून एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 45 लोक जखमी झाले आहे. आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात घडला.  पालघर (Palghar) जिल्ह्याच्या मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावर ही घटना घडली असून, ही बस पालघरकडे येत होती. जखमींना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर अपघातग्रस्तींना मदत करण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान सध्या दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. (हेही वाचा: पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू)

गेल्या काही महिन्यानामध्ये महाराष्ट्रातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढलेले दिसून येते. 16 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात 4 लोक मारले गेले होते, तर डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या रस्ता अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला होता.