पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
पुणे- मुंबई एक्सप्रेस मार्ग (फोटो सौजन्य-ANI)

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर ट्रक आणि दोन कारमध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. या अपघतात 4 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

खोपोली येथून मुंबईकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पुणे लेनवर आला त्यानंतर ट्रकटची धडक समोरुन येणाऱ्या 2 कारला जोरात बसली. या प्रकरणी एक कार 100 फूट खोल दरीत कोसळी आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघातातील व्यक्तींचे बचावकार्य सुरु आहे.