Radhika Gupta Criticises Airlines Breakfast: एडलवाईस (Edelweiss)म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता (Radhika Gupta)यांनी एक्स X वर एअरलाइन्समध्ये दिल्या जाणाऱ्या नाश्ताबद्दल असंतोष व्यक्त केला. त्याशिवाय, फ्लाइटमध्ये दिले जाणारे सँडविच बंद करण्याची मागणी केली. न्याहारी ज्यामध्ये "चीजने भरलेल्या ब्रेडचे दोन तुकडे" असतात. गुप्ता यांनी खाद्यपदार्थात आरोग्यदायी, चवदार आणि परवडणारे नाश्त्या पर्याय उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. ज्यात पराठे, इडल्या आणि ढोकळा अशांचा समावेश होतो. "हा भारत आहे, पाश्चिमात्य देश नाही. आपण अधिक चांगले करू शकता," असे या पोस्टमध्ये राधिका गुप्ता यांनी म्हटले आहे. एअरलाइन्सना सर्जनशील होण्यासाठी अधिक प्रादेशिक नाश्त्याचे पर्याय देण्याचे आवाहन केले.
सँडविच बंद करण्याची केली मागणी
I am calling for an end to airlines and makers of boxed food who serve two pieces of bread stuffed with cheese and coleslaw (veg sandwich) in the name of breakfast.
This is India not the West. We have amazing breakfast food from across the country - parantha, idlis, dhoklas,…
— Radhika Gupta (@iRadhikaGupta) September 21, 2024