शेअर बाजारातून धक्कादायक बातमी आली आहे. सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी कोसळला असून, शेअर बाजाराच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, बाजार सुरु झाल्यापासून सकाळपासूनच चडउतार पहायला मिळत होते. सुरुवात झाली तेव्हा बाजार शंभर ते सव्वाशे अंकांनी खाली होता. मध्येच तो तो एक हजार अंकानी कोसळला. पण, काही काळांनंतर तो पुन्हा सावरला. हाती आलेल्या माहितीनुसार शेअर बाजार ३५० अंकांनी खाली आहे.
देना बँक, विजया बँक आणि बडोदा बँकेचे विलिनीकरण झाले. अजूनही काही बँकांचे विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रामुख्याने आयसीआयसीआय, एचडीएफसी, एक्सीस आदी बँकांच्या शेअर घसरले आहेत. इतकेच नव्हे तर, रिलायन्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, एअरटेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांनाही या घसरणीचा मोठा फटका बसल्याचे पहायला मिळत आहे. शेअर बाजारातील घसरणीचा फटका केवळ शेअरवरच नाही तर निफ्टीवरही त्याचा परिणाम झाला आहे. निफ्टीही सुमारे सव्वाशे अंकांनी घसरला आहे.
सेन्सेक्सचे इतके घसरणे हे अनपेक्षित असल्याची चर्चा आर्थिक वर्तुळात सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉलच्या तुलनेत रुपया घसरला आहे. गेल्या चार वर्षात आपली निर्यातक्षमता प्रचंड घसरली आहे.