Boyfriend Killed Girlfriend In Delhi: दुसरं प्रेमप्रकरण पडलं भारी! 20 वेळा वार करत संपवलं प्रेयसीला, प्रियकराला अटक
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Boyfriend Killed Girlfriend In Delhi: दिल्लीत शकूर बस्ती भागात एका प्रेयसीची प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमाच्या संशयावरून हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने 20 वेळा वार केले आणि तिचा गळा कापला, यात पीडितेचे दुर्दैवी मृत्यू झाला. शकुर पोलिस ठाण्यात या प्रकरणी कारवाई चालू आहे. या घटनेनंतर दिल्ली शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत वाढत्या गुन्हेगारीला पाहून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. (हेही वाचा- तरुणाचा मृतदेह सापडल्याने ठाण्यात खळबळ, मित्राला घेतले ताब्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि आरोपी हे दोघें ही एकमेकांना गेले दीड वर्षांपासून ओळखत होते. आरोपींचे नाव पांडव कुमार असे आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना एका रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले तेव्हा असे निदर्शनास आले की, महिलेवर 20 वेळा वार करत तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासणी सुरु केले असताना परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरु केले.300 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर महिलेसोबत एक व्यक्ती दिसून आला.त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला त्यावेळी असे समोर आले की संशयित राहत्या घरातून फरार आहे.

दिल्लीतील रहिवाशी पांडव कुमार असं संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी तपासणीतून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानतंर पाडंवने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांचा रोष दाखत आरोपीची चौकशी केली. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली केली. आरोपींने सांगितले की, महिलेचे दुसऱ्या विवाहीत पुरुषासोबत संबंध  होते. त्यामुळे काही महिन्यांपासून महिला तिच्या प्रियकराशी बोलत नव्हती. त्याच्या पासून दुर राहत होती. ही गोष्ट अनावर झाल्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि तीला संपवून टाकले. महिलेने विश्वासघात केल्याने टोकाचे पाऊल तीची हत्या केली.