Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Thane Crime:  ठाण्यात एका 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना, नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. ठाण्यातील समता नगर परिसरात पाईपलाईन मार्गावर ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाच्या एका मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील समता नगर या ठिकाणी एका तरुणाची हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव तानाजी शिंदे असं आहे. या प्रकरणी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सकाळी पोलिस ठाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचा फोन आला. फोन आल्यानंतर पोलिस ठाण्यातील एक पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला लाकडाने प्रहार करून त्याची हत्या केली अशी माहिती समोर आली आहे.

पोलिस घटनास्थळी संपुर्ण तपासणी करत आहे. घटनास्थळी असलेले पुरावे जप्त करण्यात आले आहे. तानाजी शिंदे यांचा खून त्याच्या मित्रानेच केला असल्याची माहिती समोर आली आहे.  समता नगरच्या पाईपलाईन परिसरातून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. वागळे पोलिस स्टेशनचे अधिकारी या घटनेची चौकशी करत आहे. दरम्यान काल रात्री तानाजी सोबत कोण कोण होतं याचा शोध पोलिस घेत आहे. या हत्ये मागे त्याच्या मित्रांचा हात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. या प्रकरणी तानाजीच्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे.  आरोपींनी तानाजीचा खून का केला याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.