Sanatan Dharma Remark Row: उदयनिधी स्टॅलीन आणि डीएमके नेत्यांना सुप्रिम कोर्टाची नोटीस, सनातन धर्म प्रकरणावरुन वादाचे प्रकरण
Udhayanidhi Stalin | (Photo Credits: X)

तमिळनाडू सरकार आणि या सरकारमधील मंत्री, डीएमके नेते उदयनिधी स्टॅलीन (Udhayanidhi Stalin) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोटीस शुक्रवारी (22 सप्टेंबर) बजावली आहे. तामिळनाडू युवक कल्याण विभागाचे मंत्रि असलेल्या ज्युनिअर स्टॅलीन यांनी सनातन धर्मासंदर्भात (Sanatan Dharma Remark Row) केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यावरुनच दाखल झालेल्या याचिकेवरुन कोर्टाने ही नोटीस पाठवली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्या कल्पनेच्या विरोधात आहे आणि तो निर्मूलन करणे आवश्यक आहे, असे उदयनिधी यांनी केले विधान आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भात केलेल्या सर्व टिप्पण्यांवरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस जारी केली.

मद्रास येथील एका वकिलाने मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे चिरंजीव असलेल्या या मंत्र्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल व्हावा यासाठी पीआयएल दाखल केली आहे. वृत्तसंस्था एएनायने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने खासदार ए राजा, खासदार खासदार थिरुमावलावन, खासदार सु वेंकटेशन, तामिळनाडूचे डीजीपी, ग्रेटर चेन्नईचे पोलिस आयुक्त, केंद्रीय गृह मंत्रालय, हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉवमेंट विभागाचे मंत्री पीके सेकर बाबू, तामिळनाडू राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पीटर अल्फोन्स आणि इतरांनाही नोटीस बजावली आहे.

उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्म म्हणजे कोरोना, मलेरीया यांसारख्या आजारासारखा आहे. त्यामुळे विषाणू, डास आणि मच्छर यांवर उपाय केला जात नाही. त्यांना संपवले जाते. सनातन धर्माचेही तसेच आहे. या धर्मात जातियता मोठ्या प्रमाणावर असून, सामाजिक न्याय नाही. त्यामुळे तो संपवला पाहिजे अशा आशयाचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला. तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनच्या मेळाव्यात केलेल्या भाषणादरम्यान, त्यांनी ही विधाने केली आहेत. शिवाय सनातन धर्म समता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.

ट्विट

उदयनिधी यांनी म्हटले होते की, सनातन हा शब्दच मुळात संस्कृतमधून आला आहे. सनातन याचा अर्थ अंतहीन, ज्याचा चिरंतन, नाश न होणारे, यचाच अर्थ असा की ते कधीही बदलणार नाहीत. तो शाश्वत आहे, म्हणजे तो बदलता येत नाही; कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही आणि तोच अर्थ आहे. म्हणूनच सनातन माणसामाणसांमध्ये भेद करतो. सनातन हा मानसांना जात आणि धर्मामध्ये विभागतो, असेही त्यांनी म्हटले होते.