'प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या' एम के स्टॅलीन यांची केंद्र सरकारकडे मागणी; 2 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Sep 02, 2020 11:58 PM IST
नाला सोपारा येथील अकोले भागात काल रात्री एक 4 मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत कोसळली तेव्हा ती रिकामी होती. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस संकटाशी झुंजत आहे. कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे इतर अनेक प्रश्न सरकारसह नागरिकांसमोर उभे आहेत. कोरोनाच्या सावटाखाली जेईई-नीट परीक्षा होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षेला देशभरात कालपासून सुरुवात देखील झाली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आरोग्य मंत्रालयाच्या काल सकाळच्या अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3691167 वर पोहचला आहे. त्यापैकी 2839883 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 785996 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान 65288 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे.