Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Haryana Shocker: हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यात एका सेवा निवृत्त सैनिकाने (Retired Soldier)आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. सेवा निवृत्त सैनिकाने जमिनीच्या वादातून (Land dispute)धारदार शस्त्राने गळा कापून त्यांचा खून (Murder)केला, अशी माहिती मिळाली. मृतांमध्ये सेवा निवृत्त सैनिकाची आई, भाऊ, वहिनी आणि दोन मुलांचा समावेश आहे. तर घटनेतील दोघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्यानंतर सेवा निवृत्त सैनिकाने मध्यरात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळ गाठून अर्धे जळालेले मृतदेह बाहेर काढले. (हेही वाचा:Hyderabad Freak Accident: घोड्याने पोटात लाथ मारल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू, हैद्राबाद येथील मोहरम मिरवणूकीतील घटना )

पोलिसांची चाहूल लागताच निवृत्त सैनिकाने घटनास्थळावरून पळ काढला. सध्या तो फरार आहे. नारायणगड परिसरात दोन एकर जागेच्या वादातून हे हत्याकांड घडले. वर्षीय हरीश 35 वर्ष, त्याची पत्नी सोनिया 32 वर्ष, आई सरोपी 65 वर्षीय, पाच वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांचा मुलगा यांचा मृतांमध्ये समावेश आहे. (हेही वाचा: Mobile Phone Blast in Tamil Nadu: मोबाईलचा स्फोट झाला अन् दुचाकीस्वाराचा तोल गेला; तामिळनाडूमध्ये अपघातात एकाचा मृत्यू)

जखमी वडील ओम प्रकाश यांना नारायणगड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मुलींला चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (पीजीआय) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सर्व मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमझ्ये ठेवले आहेत. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुरेंद्रसिंग भौरिया हे पहाटे 3 वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.