Mobile Phone Blast in Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये मोबाईलचा स्फोट(Mobile Phone Explosion) होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला(Road Accident) आहे. कामुतनाकुडी गावाजवळ वाहनाचा तोल गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 21 जुलै रोजी मदुराई-परमाकुडी महामार्गावर घडली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी स्वाराचा तोल गेला आणि तो वाहनातून खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा:Telangana Road Accident Videos: अनिंयत्रित कारच्या धडकेत घोड्याचा मृत्यू, सहा जण जखमी,मेडक येथील घटना )
द हिंदूच्या वृत्तानुसार, जी. रजनी असे 36 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मदुराई-परमाकुडी महामार्गावर कामुथाकुडीजवळ मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. रजनीने आपला फोन ट्राऊजरच्या खिशात ठेवला होता. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान, त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते मदुराईला कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. घरी जात असताना हा विचित्र अपघात झाला. रजनीसोबत मोटारसायकलवर असलेले आर. पांडी, 31 वर्ष हे देखील जखमी झाले. त्यांच्या गालावर आणि खांद्यावर जखमा झाल्यात. रक्तस्त्रावही झाला.