
Hyderabad Freak Accident: हैद्राबादच्या चंद्रयागुट्टा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. घोड्याने पोटात लाथ मारल्याने एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी १८ जुलै रोजी घडली. २१ जुलै रोजी मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहरमची मिरवणूक सुरु असताना एका घोड्याने मुलाच्या पोटात लाथ मारली होती. ( हेही वाचा- संशयामुळे उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब; पत्नी आणि 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून पतीने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, घोड्याने लाथ मारताच, मुलगा जमिनीवर कोसळला. त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला तात्काळ रुग्णलायात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पोटात गंभीर जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मद इब्राहिम असं मृत मुलाचे नाव आहे.
मोहम्मद आपल्या मित्रांसोबत मोहरमची मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. तेथे त्याच्या मित्रांनी घोड्यावर बसून सवारी करायचे ठरवले. सगळे जण घोड्याजवळ गेले, घोडाने जोरात लाथ मारली. ही लाथ जोरात मुलाच्या पोटाला लागली. तो काही क्षणातच जमिनीवर कोसळला. त्याचे पोटात दुखू लागले त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. तेथून त्याला दोन दिवसानंतर दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर दुखापतीमुळे त्याचा जीव वाचू शकला नाही.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम १९४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेची अधिक तपास करत आहे. पोलिसांनी घोडा आणि त्याच्या मालकाला ताब्यात घेतले आहे.