Hyderabad Shocker: संशयामुळे उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब; पत्नी आणि 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून पतीने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या

घरी पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर गणेशने सुचित्रा येथील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली. गणेशच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो ऑटोरिक्षा चालक होता आणि काही वर्षांपूर्वी हे कुटुंब महाराष्ट्रातून आले होते.

Hyderabad Shocker: संशयामुळे उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब; पत्नी आणि 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून पतीने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या
Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Hyderabad Shocker: सिकंदराबाद (Secunderabad) च्या बोवनपल्ली भागात (Bowenpally Area) एका व्यक्तीने आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी पत्नी आणि 10 महिन्यांच्या मुलीची हत्या (Murder) केली. रविवारी सकाळी ही घटना घडली. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिला आणि तिच्या मुलीचे मृतदेह ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेशने पत्नी स्वप्ना आणि मुलगी नक्षत्र यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने गणेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (हेही वाचा -Kid Dies While Making Reel with Noose: रील बनवताना 11 वर्षांच्या मुलाचा फास लागून मृत्यू; मध्य प्रदेशातील मुरैना येथील घटना (Watch Video))

पत्नीच्या चारित्र्यावर संशय -

घरी पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर गणेशने सुचित्रा येथील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली. गणेशच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो ऑटोरिक्षा चालक होता आणि काही वर्षांपूर्वी हे कुटुंब महाराष्ट्रातून आले होते. बोवेनपल्ली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Madya Pradesh Kidnapping Video: वसतिगृहातून 17 वर्षाच्या मुलीचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद, प्रियकरावर संशय)

दरम्या, शनिवारी पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली होती. रामगड भुंदड गावात घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने गेल्या काही दिवसांपासून तो तिच्याशी वाद घालत होता. दोघांच्या लग्नाला सुमारे 12 वर्षे झाली असून त्यांना दोन मुलेही आहेत. गुन्हा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2024 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).