Kid Dies While Making Reel with Noose: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मुरैना जिल्ह्यातील (Morena District) सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा विद्यार्थी गळ्यात फास लावून रील (Reel) बनवत होता. यादरम्यान त्याचा फास बसल्याने मृत्यू झाला. करण परमार असे मृत मुलाचे नाव असून तो 11 वर्षांचा होता. शनिवारी सायंकाळी तो मित्रांसोबत लेन रोडवरील मोकळ्या प्लॉटमध्ये खेळत होता. रील बनवण्यासाठी तो झाडाला एका दोरीच्या साहाय्याने लटकला होता.
खेळादरम्यान मुलाचा पाय खालच्या दगडावरून घसरला, त्यामुळे फास घट्ट झाला. मुलाची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून त्याचे मित्र घटनास्थळावरून घाबरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मुलाच्या गळ्याला लागलेला फास काढला आणि त्याला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खेळत असताना ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. (हेही वाचा -Sambhaji Nagar Accident: रील काढताना Accelerator दाबला अन् कार थेट दरीत कोसळली, तरुणीने गमावला जीव (Watch Video))
रील झाली रियल -
जिल्ह्यातील अंबा पोलिस स्टेशन हद्दीतील लेन रोडवर शनिवारी सायंकाळी रवी परमार यांचा मुलगा करण उर्फ कान्हा वय 11 वर्ष हा मित्रांसोबत घराजवळील मोकळ्या मैदानात खेळत होता. रील बनवण्यासाठी सर्व मित्रांनी मरणाचा खेळ खेळण्याचे नाटक केले. यामध्ये करणने शीशमच्या झाडाचा फास तयार करून त्याच्या गळ्यात घातला. खेळाचा एक भाग म्हणून करणला मेल्याचे नाटक करायचे होते.
दरम्यान, झाडाला लटकलेला करणचा पाय दगडावरून घसरला आणि फास घट्ट झाला. काही क्षण करणच्या अंगात काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर सर्व मुले आपले मोबाईल सोडून घाबरून पळून गेली. या संपूर्ण खेळाचा व्हिडिओही बनवला जात होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Reel Making Video: रिल बनवण्यासाठी स्टंटबाजी; तरुणाचा हात पकडून तरुणी हवेत लटकली (Watch Video))
पहा व्हिडिओ -
#WATCH | Dangerous Stunt Gone Wrong: 11-Year-Old Dies While Making a Reel with Noose In Morena; Friends Mistake Suffocation for Acting#MPNews #MadhyaPradesh pic.twitter.com/Ewylifbr8g
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) July 21, 2024
या घटनेची माहिती करणच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून करणच्या गळ्यातील फास काढला आणि त्याला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अंबा पोलिसांनीही सिव्हिल हॉस्पिटल गाठले.