संभाजीनगरच्या खुलताबाद (Chhatrapati Sambhaji Nagar)  तालुक्यात  रील्स (Reels)  बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. श्वेता दिपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभंजन इथं दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती. तिला कार चालवता येत नव्हती. तरी देखील तीने कार चालवण्यास घेतली. कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय अॅक्सिलरेटरवर अधिक दाबानं पडला, त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)