Madya Pradesh Kidnapping Video: वसतिगृहातून 17 वर्षाच्या मुलीचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद, प्रियकरावर संशय

ग्वाल्हेरमधील बालिका वसतिगृहातून ६ नराधमांनी एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे एक महिला रक्षक, इतर तीन सुरक्षा रक्षक आणि एका पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थित अवघ्या २० मिनीटांत अपहरण केले.

Madya Pradesh Kidnapping Video: वसतिगृहातून 17 वर्षाच्या मुलीचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद, प्रियकरावर संशय
Kidnapping video PC TW

Madya Pradesh Kidnapping Video: ग्वाल्हेरमधील बालिका वसतिगृहातून 6 नराधमांनी एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे एक महिला रक्षक, इतर तीन सुरक्षा रक्षक आणि एका पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थित अवघ्या 20 मिनीटांत अपहरण केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा- कृष्णपुरा छतावर अश्लिल कृत्य करणं पडलं महागात, जोडप्यांवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारीच्या पहाटे 2 च्या सुमारास कंपू येथील वन स्टॉप सेंटरमध्ये ही घटना घडली. अपहरण करण्यासाठी सहा तरुण कॅम्पस जवळ आले. त्यांनी मागील बाजूस असलेल्या ४ फूट उंच भिंतीवरून उडी मारली, काठीचा वापर करून खिडकीतून गार्ड रुमच्या चाव्या घेतल्या आणि दरवाजा उघडला. तसेच, मुलीला हाक मारली आणि तिला सोबत घेऊन गेले. तरीही वसतिगृहातून मुलीचे अपहरण करण्यात आले.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मुलगी आरोपींसोबत जाताना दिसत आहे. यावेळी ड्युडीवर असलेली महिला गार्ड झोपलेली आहे. आरोपींनी तोंड रुमालाने झाकले होते. मुख्य गेटवर दोन महिला आणि एक पोलिस अधिकारी असं एकूण तीन सुरक्षा रक्षक तैनात होते.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधिकारी अखिलेश रेनवाल आणि सीएसपी अशोक जदोन यांनी सांगितले की, मुलगी यापूर्वी दोनदा घरातून पळून गेली होती. या घटनेत मुलीच्या प्रियकराचा हात असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हे अपहरण नियोजनपूर्वक केले आहे असा पोलिसांना विश्वास आहे. यापूर्वी ही तरुणी थाटीपरू परिसरातून बेपत्ता झाली होती,त्यानंतर तिचा प्रियकरावर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2024 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).