भारतीय लष्कराने (Indian Army) न्यायाधीश महाधिवक्ता (JAG) प्रवेश योजना 28 व्या अभ्यासक्रमासाठी अविवाहित पात्र महिला आणि पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 28 ऑक्टोबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांवर भरतीसाठी (Recruitment) अर्ज प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. तर ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असेल. या प्रक्रियेद्वारे न्यायाधीश महाधिवक्ता शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या 7 पदांची भरती केली जाईल. ज्यात पुरुषांसाठी 5 आणि महिलांसाठी 2 पदे आहेत. निवडलेल्या पुरुष आणि महिला उमेदवारांना भारतीय लष्करात 14 वर्षे म्हणजेच 10 वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल. जे पुढील 4 वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते.
भारतीय लष्करातील जेएजी 28 वी प्रवेश योजना 2021 साठी शैक्षणिक पात्रता किमान 55%सह एलएलबी पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असावा. वयोमर्यादेबद्दल बोलताना या पदांवर भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे. मात्र सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल. हेही वाचा UPSC CDS II Result 2020 Released: यूपीएससी सीडीएस II चा निकाल जाहीर; upsc.gov.in वर असे पहा मार्क्स
तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. या पदांच्या भरतीसाठी अर्जाच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी आणि एसएसबी मुलाखतीतून जावे लागेल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्य JAG प्रवेश योजना 2021 साठी अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in द्वारे 28 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासली पाहिजे.
उमेदवारांना दोन स्टेज सिलेक्शन प्रक्रियेद्वारे ठेवले जाईल. जे स्टेज I उत्तीर्ण करतील स्टेज II मध्ये जातील. जे स्टेज I मध्ये अपयशी ठरतील त्यांना त्याच दिवशी घरी पाठवले जाईल. SSB मुलाखतींचा कालावधी पाच दिवसांचा आहे. यानंतर स्टेज II नंतर शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. SSB ने शिफारस केलेल्या आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांना उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार गुणवत्तेच्या क्रमाने प्रशिक्षणासाठी सामील होण्याचे पत्र जारी केले जाईल.