UPSC CDS II Result 2020 Released: यूपीएससी सीडीएस II चा निकाल जाहीर; upsc.gov.in वर असे पहा मार्क्स
online ((Photo Credits: Pexels)

यूपीएससी (UPSC) कडून Combined Defence Services Examination (II), 2020 चा निकाल आज (1 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आला आहे. कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर तो जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहण्यासाठी upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. इथेच निकाल पाहता आणि डाऊनलोड देखील करता येणार आहे.

अधिकृत नोटिफिकेशनच्या माहितीनुसार, 'मेरीट लिस्ट बनवताना उमेदवारांच्या मेडिकल एक्झामिनेशनचा विचार करण्यात आलेला नाही. हे प्रोव्हिजनल candidature आहे. उमेदवारांची जन्मतारिख, शैक्षणिक पात्रता याची पडताळणी आर्मी हेड क्वार्टर कडून करण्यात येईल. ' तुमचा निकाल ऑनलाईन कसा पहाल ते इथे पहा. या डिरेक्ट लिंक वर पहा निकाल. 

UPSC CDS Result II, 2020 ऑनलाईन कसा पहाल?

  • अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
  • होमपेजवर 'What's New' सेक्शन खाली असलेल्या Final Result: Combined Defence Services Examination (II),2020 (OTA) वर क्लिक करा.
  • नवीन वेब पेज ओपन होईल.
  • Combined Defence Services Examination (II),2020 (OTA) डॉक्युमेंत लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.

नक्की वाचा: MPSC Clerk Typist Mains 2019: महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 लिपिक टंकलेखक परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध .

भविष्यात गैरसोय टाळण्यासाठी निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा. आजच्या निकालामध्ये 141 पुरूष आणि 51 महिला उमेदवार असे एकूण 192 उमेदवार शॉर्टलिस्ट झाले आहेत. याद्वारा 196 जागांवर नोकरभरती केली जाणार होती.