
Rangareddy Fire Tragedy: तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील पुप्पलगुडा पाशा कॉलनीत शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात आगीत तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मणिकोंडा नगरपालिकेच्या हद्दीत हि घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. नर्सिंग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही आग दुकानात झपाट्याने पसरल्याने उपस्थितांना पळून जाण्याची संधी मिळाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
येथे पाहा, पोस्ट
तेलंगाना | रंगारेड्डी में आग लगने की घटना में 3 लोगों की मौत हो गई और 2 अन्य लोग घायल हो गए।
कल शाम करीब 6 बजे रंगारेड्डी के पुप्पलगुडा में उस्मान किराना दुकान में शॉर्ट सर्किट के कारण आग लग गई, जिसके कारण तीन लोगों की मौत हो गई और दो लोग घायल हो गए: नरसिंगी पुलिस
— ANI_HindiNews (@AHindinews) March 1, 2025
डीसीपी राजेंद्र नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक किराणा दुकानदाराच्या घराला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास आग लागली होती. तळमजल्यावरील किराणा दुकानात विजेचा शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली जात आहे. या आगीत सात वर्षीय सिजिरा खातून, ७० वर्षीय जमीला खातून आणि ४० वर्षीय सहाना खातून यांचा गुदमरून मृत्यू झाला. अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.