भारतात लॉकडाउन पूर्णपणे अपयशी; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
Congress President Rahul Gandhi (File Photo)

भारतात (Coronavirus In India) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणू परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा (Lockdown) निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारने लॉकडाउन शिथिल करण्यसा सुरूवात केली असून, हा लॉकडाउन अपयशी ठरले असल्याचा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. नुकताच राहुल गांधी यांनी लॉकडाउनबाबत भारताची तुलना इतर देशांशी केली आहे. दरम्यान, त्यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचाही कोविड-19 चा एक आलेख लोंकासमोर मांडला आहे. जगातील इतर राष्ट्रांमध्ये लॉकडाउन हटवताना करोना बाधितांची संख्या कमी होत आहे. तर भारतात उलट चित्र आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

करोनाचा शिरकाव जगातील इतर राष्ट्रांमध्ये होत असल्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी याविषयावर आपली भूमिका मांडत आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावरही त्यांनी सुरूवातीपासून केंद्राला काही सूचना केल्या होत्या. केंद्र सरकारनं लागू केलेला लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका केली होती. नुकताच राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला आहे. या राष्ट्रांमध्ये संख्या वाढत असताना लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संख्या कमी होताना दिसत आहे. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाउन हटवण्यात आला आहे. असे या आलेखातून दिसते. या आलेखांबरोबर राहुल गांधी यांनी “हे लॉकडाउन अपयशी झाल्यासारखे दिसत आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- देशात कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ; इटलीला मागे टाकत भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 2,36,657

राहुल गांधी यांचे ट्वीट-

भारतात कोरोनाविषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 36 हजार 657 पोहचली आहे. यापैकी 6 हजार 642 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 14 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.