Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत 9887 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने देशातील कोरोना बाधितांची संख्या 236657 इतकी झाली आहे. त्यामुळे आता कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने इटलीला (Italy) देखील मागे टाकले आहे. चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरात उगम पावलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरातील अनेक देशांमध्ये झाला. कोरोना बाधितांच्या आकडेवारीत इटली देश सहाव्या स्थानी होता. परंतु, देशातील कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारताने इटलीला देखील मागे टाकले आहे. इटलीमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 2.34 लाख इतका होता.

देशात मागील 24 तासांत कोविड-19 चे 9887 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 294 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 115942 इतकी झाली असून एकूण 6642 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर देशातील 115942 रुग्णांवर उपचार सुरु असून 114073 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती भारताच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Coronavirus Update: भारतात कोरोनाचा हाहाकार! 9887 नव्या रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2,36,657 वर)

विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने इटलीला मागे टाकले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात एकूण 66.64 लाख नागरिकांना कोविड-19 ची लागण झाली असून 3.91 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना  बाधित रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 80229 इतकी झाली असून 2849 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान 42215 रुग्णांवर उपचार सुरु असून 35147 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. विशेष म्हणजे रुग्णसंख्येत दर दिवशी मोठी भर पडत आहे.