Coronavirus Update: भारतात कोरोनाचा हाहाकार! 9887 नव्या रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2,36,657 वर
Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. भारतात गेल्या 24 तासांत नवे 9887 कोरोना रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,36,657 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 294 रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा 6642 वर पोहोचला आहे. सद्य घडीला देसात 1,15,942 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,14,073 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सद्य घडीला राज्यात एकूण 80,229 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार कोरोना विषाणूंचा संसर्ग थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. Coronavirus: भारतामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव नोव्हेंबरमध्येच झाला होता? हैद्राबादच्या शास्त्रज्ञांचा दावा, सापडला नवीन स्ट्रेन

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths** Total Confirmed cases*
1 Andaman and Nicobar Islands 0 33 0 33
2 Andhra Pradesh 1654 2576 73 4303
3 Arunachal Pradesh 44 1 0 45
4 Assam 1651 498 4 2153
5 Bihar 2342 2225 29 4596
6 Chandigarh 77 222 5 304
7 Chhattisgarh 633 244 2 879
8 Dadar Nagar Haveli 13 1 0 14
9 Delhi 15311 10315 708 26334
10 Goa 131 65 0 196
11 Gujarat 4901 13003 1190 19094
12 Haryana 1439 2134 24 3597
13 Himachal Pradesh 199 189 5 393
14 Jammu and Kashmir 2202 1086 36 3324
15 Jharkhand 464 410 7 881
16 Karnataka 3090 1688 57 4835
17 Kerala 973 712 14 1699
18 Ladakh 48 48 1 97
19 Madhya Pradesh 2734 5878 384 8996
20 Maharashtra 42224 35156 2849 80229
21 Manipur 91 41 0 132
22 Meghalaya 19 13 1 33
23 Mizoram 21 1 0 22
24 Nagaland 94 0 0 94
25 Odisha 996 1604 8 2608
26 Puducherry 63 36 0 99
27 Punjab 344 2069 48 2461
28 Rajasthan 2507 7359 218 10084
29 Sikkim 3 0 0 3
30 Tamil Nadu 12700 15762 232 28694
31 Telengana 1550 1627 113 3290
32 Tripura 519 173 0 692
33 Uttarakhand 860 344 11 1215
34 Uttar Pradesh 3828 5648 257 9733
35 West Bengal 4025 2912 366 7303
Cases being reassigned to states 8192 8192
Total# 115942 114073 6642 236657
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR

लॉकडाऊनचे आदेश लागू केल्यापासून ते आतापर्यंत प्रवासी मजूरांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. या मुद्द्यावरुन राजकरण सुद्धा करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याच दरम्यान आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) प्रवासी मजूरांच्या मुद्द्यावरुन पुन्हा सुनावणी केली आहे.

सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान असे म्हटले आहे की, 15 दिवसांच्या आतमध्ये प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पोहचवण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व राज्यांना रोजगार व इतर मदत कशा देणार आहेत या सर्व गोष्टी रेकॉर्डवर आणाव्या लागतील. यासह प्रवासी मजुरांची नोंदणीदेखील करावी लागेल.