Rahul Gandhi Viral Video In Nepal Pub: नेपाळच्या नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसले राहुल गांधी; व्हिडिओ शेअर करत भाजपने साधला निशाणा
Rahul Gandhi Viral Video In Nepal Pub (PC - Twitter)

Rahul Gandhi Viral Video In Nepal Pub: भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रभारींनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माजी काँग्रेस अध्यक्ष नाईट क्लबमध्ये (Nightclub) पार्टी करताना दिसत आहेत. भाजपचे आयटी प्रभारी अमित मालवीय (Amit Malviya) यांच्याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनीही राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपचे सोशल मीडिया प्रभारी मालवीय यांनी ट्विट करून लिहिले की, 'मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते.'

व्हिडिओमध्ये, राहुल गांधी एका अंधुक नाईट क्लबमध्ये एका मित्रासोबत दिसत आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ काठमांडूमधील एका लोकप्रिय नाईट क्लबमध्ये शूट करण्यात आला आहे. राहुल गांधी सोमवारी त्यांची पत्रकार मैत्रिण सुम्निमा उदासी हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळच्या राजधानीतील मॅरियट हॉटेलमध्ये होते. (वाचा - PM Berlin Visit: आधी देशात फक्त 200-400 स्टार्टअप होते आज देशात 68,000 हून अधिक स्टार्टअप्स आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल सध्या नेपाळच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. हा व्हिडिओ या दौऱ्याचा सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, ते काठमांडूमधील प्रसिद्ध नाईट क्लब लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स (Lord of the Drinks) मध्ये दिसत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

या व्हिडिओची खिल्ली उडवत भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, "राहुल गांधी काय करत आहेत, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार होत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तर राजस्थान पेटले आहे. चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत.

याशिवाय केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करताना रिजिजू म्हणाले की, व्हेकेशन, पार्टी, हॉलिडे, प्लेजर ट्रिप, खासगी परदेशी भेटी आदी गोष्टी देशासाठी नवीन नाहीत.