Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter)

Congress Lok Sabha 2024 Candidates List: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी (Congress First List) जाहीर केली आहे. यामध्ये 39 नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल (KC Venugopal) आणि अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची पहिली यादी जाहीर केली. या यादीत राहुल गांधी (Rahul Gandhi), भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या सात दिवसांत जाहीर होऊ शकतात. सूत्रांवर विश्वास ठेवला तर ही निवडणूक 7 टप्प्यात होऊ शकते. मात्र, त्याआधीच सर्वच पक्ष उमेदवारांची यादी तयार करण्यात व्यस्त आहेत. भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याशिवाय अनेक प्रादेशिक पक्षांनीही याद्या जाहीर केल्या आहेत.

केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना ते म्हणाले की, राहुल गांधी वायनाडमधून, भूपेश बघेल राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाच्या पहिल्या यादीत 15 सामान्य उमेदवार आणि 24 एससी-एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. तसेच, 12 उमेदवार आहेत ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. (हेही वाचा -Sudha Murty Nominated To Rajya Sabha: इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती; पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली माहिती)

काँग्रेसने छत्तीसगडमधील सहा, कर्नाटकातील सात, केरळमधील 16, तेलंगणातील चार, मेघालयातील दोन, लक्षद्वीप, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेवर उमेदवारांची नावे जाहीर केली. प्राप्त माहितीनुसार, तिरुअनंतपुरममधील शशी थरूर, मेघालयातील व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधील आशिष साहा यांची नावे समोर आली आहेत. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: विद्यमान भाजपा खासदारांचा पत्ता कट? राजकीय वर्तुळातच चर्चा, यादीही व्हायरल)

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस सीईसीची पुढील बैठक 11 मार्च रोजी होणार आहे. 7 मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. नुकतीच सीईसीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली होती.